History will note the work of Corona Warriors in India: Governor Bhagat Singh Koshyari.
इतिहास भारतातील कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.
राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर सन्मानित.
मुंबई : जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु कोरोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स,
‘परिश्रम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ४४ डॉक्टरांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे आज सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, शिक्षण संस्थाचालक लल्लन तिवारी, ‘परिश्रम’ संस्थेचे निमंत्रक ॲड. अखिलेश चौबे, डॉ. राजकुमार त्रिपाठी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
एकीकडे विज्ञान, औषधीशास्त्र व वैद्यकीय तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगती होत असताना दुसरीकडे नवनवे आजार जगात येत आहेत. कोरोना संसर्ग सर्वांसाठी परीक्षेचा काळ होता. अमेरिकेसारख्या प्रगत देशात रुग्णसंख्या व मृत्यूदर जास्त होता. परंतु सेवाभाव भारतीयांच्या डीएनएमध्ये असल्यामुळे या कठीण काळात भारतातील रुग्णसंख्या व मृत्यूदर कमी होता. आरोग्य सेवक तसेच समाजसेवकांचे हे कार्य भविष्यातील डॉक्टरांकरिता मार्गदर्शक ठरेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
