विभागीय महारोजगार मेळाव्याचे २१ एप्रिल रोजी आयोजन

Job opportunities in industries registered on Mahaswayam webportal महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Organization of Departmental Maharojam Mela on 21st April

विभागीय महारोजगार मेळाव्याचे २१ एप्रिल रोजी आयोजन

२१ एप्रिल रोजी  औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी पिंपरी येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन वर्ष २०२३ च्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बानाई संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी पिंपरी येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रामधील खाजगी उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्याकडून सुमारे 2 हजारपेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहे. या पदांकरीता किमान इयत्ता १० वी, १२ वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविकाधारक, Job opportunities in industries registered on Mahaswayam webportal महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar Newsअभियांत्रिकी पदवी, एमबीए, बीसीए उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे.

मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *