इंदौर येथे २२ मार्च रोजी माजी सैनिकांसाठी रोजगार मेळावा

District Soldier Welfare Officer, Pune जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Employment fair for ex-servicemen on March 22 at Indore

इंदौर येथे २२ मार्च रोजी माजी सैनिकांसाठी रोजगार मेळावाDistrict Soldier Welfare Officer, Pune जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : पुनर्वसन महासंचालक कार्यालय (डीजीआर), माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालय यांच्यामार्फत २२ मार्च रोजी गॅरिसन मैदान, इन्फंट्री म्युझियम जवळ, मॉल रोड, महू, इंदौर-४५३४४९ येथे माजी सैनिकांच्या पुर्नरोजगार आणि पुनर्वसनासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

नोकरीसाठी इच्छुक असणारे पात्र माजी सैनिक आणि उद्योग क्षेत्रातील नियोक्ते यांच्यात थेट आणि त्वरित संवाद साधणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. इच्छुक माजी सैनिकांनी माजी सैनिक ओळखपत्र, बायोडेटाच्या पाच प्रती व छायाचित्रासह उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी सहसंचालक, नवी दिल्ली दूरध्वनी क्रमांक ०११-२०८६२५४२ व पुनर्वसन महासंचालक कार्यालय लखनौ, भ्रमणध्वनी क्रमांक ९४६८८९८२५८ किंवा ७०६५५०२७०८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

‘महाप्रित’ची राज्याबाहेर भरारी; गोवा शासनाचे सोलर प्रकल्प त्वरित सुरु होणार

Spread the love

One Comment on “इंदौर येथे २२ मार्च रोजी माजी सैनिकांसाठी रोजगार मेळावा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *