Permission to increase the admission capacity of Annasaheb Chudaman Patil Memorial Medical College degree course to 150.
अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेजच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता १५० करण्यास परवानगी.
मुंबई : धुळ्यातील साक्री रोड येथील अण्णासाहेब चुडामण पाटील मेमेारियल मेडिकल कॉलेजच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून
या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार 150 इतकी राहील.
सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.
