Applications for RTE 25% admission process can be filled from 16th February – School Education Minister Prof. Varsha Gaikwad.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ०१ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर( https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex)सूचना यथावकाश देण्यात येतील. पोर्टलवरील वेळोवेळी दिलेल्या सूचनांची सर्व संबंधितांती नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही शिक्षक संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
