Beating the Retreat concludes Republic Day in New Delhi.
बीटिंग द रिट्रीट कार्यक्रमानं नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सांगता.
नवी दिल्ली: नवी दिल्लीच्या ऐतिहासिक विजय चौकात यंदाचा बीटिंग द रीट्रीटचा सोहळा नुकताच संपन्न झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेक इन इंडिया ही संकल्पना धरुन यावेळी ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं. बोटलॅब डायनॉमिक्स या स्टार्ट अपनं आयआयटीच्या सहकार्यानं हा ड्रोन शो करण्यात आला. चीन, रशिया आणि ब्रिटननंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोन शो करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे.
यामध्ये १ हजार ड्रोनच्या सहाय्यानं आकाशात, भारतीय प्रतिकांच्या विविधरंगी २६ संरचना सादर करण्यात आल्या. या दिमाखदार सोहळ्यानं आणि भारतीय नौदल, वायूदल आणि थळसेना तसंच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या बँड पथकांनी सादर केलेल्या संगीत रचनांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
