BCCI announces change in venues for the upcoming West Indies’ Tour of India.
वेस्ट इंडिजच्या आगामी भारत दौऱ्यासाठी बीसीसीआयने स्थळांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे.
मुंबई : वेस्ट इंडिजच्या आगामी भारत दौऱ्यासाठी बीसीसीआयने स्थळांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. तीन एकदिवसीय सामने आता नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे
बीसीसीआयने म्हटले आहे की, मूळ घोषणा केल्याप्रमाणे मालिका सहाऐवजी दोन ठिकाणी मर्यादित ठेवण्याचा निर्णय संघ, सामना अधिकारी, प्रसारक (Broadcasters) आणि इतर भागधारकांचा (Stakeholders) प्रवास आणि हालचाली कमी करून जैवसुरक्षा ( Biosecurity) धोके कमी करण्यासाठी घेण्यात आला आहे.
वेस्ट इंडिज पुढील महिन्याच्या 1 तारखेला तीन एकदिवसीय आणि अनेक T20 सामन्यांचा समावेश असलेल्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी (White-Ball Series )भारतात येणार आहे ज्यानंतर त्यांना 3 दिवसांचा अलगाव कालावधी जाईल.
सामने सुरू होण्यापूर्वी पुढील दोन दिवसांत सराव सत्र सुरू होतील. ही मालिका पुढील महिन्याच्या ६ तारखेला सुरू होईल आणि २० फेब्रुवारीला संपेल.
