The annual prize distribution ceremony concluded in Sadhana Vidyalaya.
साधना विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
हडपसर : साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेज हडपसर येथे सन 2021 -2022 व सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला . शालांत परीक्षा,सांस्कृतिक कार्यक्रम यात यश मिळवलेल्या एकूण 69 विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे, माजी रयतसेवक आनंदराव साळुंखे ,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे ,पांडूरंग गाडेकर, धनाजी सावंत ,गोकूळ टकले ,पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कांताराम काळे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगीता होगले,सर्व विद्यार्थी, बहुसंख्य पालक, शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम यांनी केले.सूत्रसंचालन अनिल वाव्हळ व ज्ञानेश्वर सरोदे यांनी केले, तर पर्यवेक्षिका माधुरी राऊत यांनी आभार मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com



One Comment on “साधना विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न”