Veteran actor Ramesh Dev was cremated in Mumbai.
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार.
ल रात्री मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले इथल्या पारशी वाडा स्मशान भूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.तत्पूर्वी, सकाळी ११ ते दुपारी दीड यावेळेत त्यांचे पार्थिव त्यांच्या वर्सोवा इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, किरण कुमार, महेश मांजरेकर, राज ठाकरे, विनय येडेकर, विजय कदम, आशुतोष गोवारीकर, रेणुका शहाणे, मकरंद देशपांडे आणि महेश कोठारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतलं.
रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अभिनेता, सहाय्यक अभिनेता, खलनायक अशा वेगवेगळ्या भूमिकामधल्या मधल्या समर्थ अभिनयानं चित्रपट रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. १९५० साली मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यावर ६० च्या दशकात उमज पडेल तर, वरदक्षिणा, मोलकरीण, अपराध यासारख्या मराठी चित्रपटातल्या भूमिकांमधून रमेश देव यांनी आघाडीच्या अभिनेत्यांमधलं स्थान पटकावलं.
दिग्दर्शक फणी मजुमदार यांचा ‘आरती’ हा चित्रपट रमेश देव यांनी अभिनय केलेल्या सुरुवातीच्या काळातल्या काही हिंदी चित्रपटांपैकी एक चित्रपट. आनंद, मेरे अपने, कसौटी यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या.
