Significant decline in Naxal violence in last 12 years.
नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये गेल्या १२ वर्षात लक्षणीय घट.
नवी दिल्ली : नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हिंसाचारात लक्षणीय घट झाल्याचं आज केंद्र सरकारने सांगितलं. गेल्या १२ वर्षात अशा घटना ७७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. २००९ मध्ये अशा हिंसाचाराच्या २ हजार २५८
या कालावधीत नागरिक आणि सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूचं प्रमाणही ८५ टक्क्यांनी घसरलं आहे. २०१० मध्ये सर्वाधित १ हजार ५ जणांचे मृत्यू झाले होते. २०२१ मध्ये हे प्रमाण १४७ पर्यंत घसरलं, असं त्यांनी सांगितलं.
२०१० मध्ये ९६ जिल्ह्यांमध्ये असलेला उपद्रव आता ४६ जिल्ह्यांमध्ये शिल्लक आहे. सरकारनं नक्षलवाद्यांकडून होणारा उपद्रव कमी करण्यासाठी विविध उपाय केले आहेत. रस्त्यांचं जाळं विस्तारलं आहे, दूरसंचार सुविधा वाढवल्या आहेत, कौशल्य विकासाच्या योजना राबविल्या आहेत, असं ते म्हणाले.
