कमळगड: सौंदर्याने व निसर्गाने नटलेले अनोखे पाषाण पुष्प
लेखन डॉ सचिन सावंत (sachin.sawant25@gmail.com)
सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारा सारखेधारण केले आहेत. धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते दोन्ही अंगानी
दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे. कमळगडावर जाण्याचे तीन महत्त्वाचे मार्ग आहेत
एक मार्ग जो महाबळेश्वर हून येतो. महाबळेश्वराच्या केट्स पॉइंट वरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरले की सुमारे दोन तासांमध्ये समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गावी पोहोचतो तिथून पुढे दोन अडीच तासात आपण कमळगडावर पोहोचतो.
दुसरा मार्ग जो आहे तो पुणे – भोर मार्गे अंबवडे- रायरेश्वर – केंजळगड – खावली – वाशिवली – वासोळे – तुपेवाडी अशा मार्गाने आपल्याला या गडावर जाता येते.
तिसरा जो मार्ग आहे तो सगळ्यात सोयीचा आहे. कमळगडा वर जाण्यासाठी वाई या सोयीच्या ठिकाणी येऊन आपण वाई मधून कमळगडावर जाऊ शकतो. वाई मधून नांदवणे या गावात यावे लागते व तेथून आपण गडावर जाऊ शकतो.

मंदिरापासून पुढे पंधरा-वीस मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो नंतर आपण एका मोकळ्या मैदानात येतो येथे धनगरांची वस्ती आहे.याच पठारावरून आपल्याला कमळगड पूर्णपणे दिसतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे. तसे पाहायला गेलो तर गडावर एरवी आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच आढळत नाही. गडाला लागून एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते तिला नवरानवरी चे डोंगर म्हणतात.
गडावर पोहोचल्यावर पुढे जमिनीत आपल्याला 40 ते 50 फूट लांबीचे एक रूंद भुयार दिसते त्याला आत उतरायला पायर्याही आहेत हीच ती गेरूची किंवा कावेची विहीर.उंच अशा ह्या साधारण 50 ते 55 पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते.
तळाशी पोहोचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते. गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे तिच्यावर बुरुजाचे
# कमळगड # प्रकार – गिरिदुर्ग
डोंगररांग – महाबळेश्वर जिल्हा – सातारा
श्रेणी – मध्यम , उंची – 4200 फूट
