The government is seriously considering using ethanol-blended fuel in the air sector too: Nitin Gadkari
हवाई क्षेत्रातही इथेनॉल मिश्रीत इंधनाचा वापर करण्याचा सरकार गांभीर्यानं विचार करत आहे- नितीन गडकरी
इथेनॉल परिषदेत ते बोलत होते.भारतानं साखर निर्यात सबसिडी डिसेंबर २०२३पासून बंद करण्याच वचन दिलं आहे. यासाठी सरकारनं २४५ कोटी लिटर उस मळी खरेदी करण्याचं धोरण स्विकारलं आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ५५ लिटर उसमळीचा पुरवठा उस कारखान्यांनी केला आहे, त्यामुळे साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल निर्मितीवर शेतऱ्यांनी लक्ष द्यायला हवं, असंही गडकरी यांनी सांगितलं.
इथेनॉल, मिथिनॉल, बायो इथेनॉल, बायो सीएनजी, बायो डीझेल, बायो एलएनजी, हरित हायड्रोजन आणि विद्युत आपले भविष्य असून सरकार ह्यूंडाइ, सूझूकी, टोयाटो या चारचाकी वाहन निर्मात्यांसह बजाज, हिरो यारख्या दूचाकी वाहन निर्मात्यांनाही मिश्र इंधनावर आधारीत वाहनांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहोत.
प्रधानमंत्र्यांनी तीन इथेनॉल पंपाचं उद्घाटन केलं आहे. भविष्यातही सरकार नागरिकांसाठी आणखी बायो इंधन विक्री पंप उभारणार असून, उस कारखान्यांनी आपल्या कारखान्यांत तसंच परिसरात इथेनॉल पंप उभारावेत असं आवाहन त्यांनी उपस्थित इथेनॉल उत्पादकांना केलं. इथेनॉल आणि हरित इंधनाच्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ येइलच शिवाय पर्यावरणाचंही मोठ्या प्रमाणात रक्षण करता येइलं असंही गडकरी म्हणाले.
