From next year, a government function will be organized in Babasaheb’s hometown of Ambadwe
आंबडवे या बाबासाहेबांच्या मूळ गावी पुढच्या वर्षापासून जयंतीच्या शासकीय कार्यक्रमाचे आयोजन होणार
रत्नागिरी : रत्नागिरीतल्याआंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावातल्या स्फुर्ती स्थळाच्या ठिकाणी पुढच्या वर्षापासून उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं शासकीय जयंती साजरी
केली जाईल अशी घोषणा, या विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
केली जाईल अशी घोषणा, या विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.बाबासाहेबांच्या जयंतीनिमीत्त सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी आज आंबडवे इथल्या स्फूर्ती स्थळला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं.
त्यावेळी आंबडवे हे बाबासाहेबांचं मूळ गाव असूनही, इथे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचा किंवा जयंतीचा कोणताही शासकीय कार्यक्रम होत नसल्याची खंत आंबेडकर कुटुंबियांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर सामंत यांनी ही घोषणा केली. दरम्यान आंबडवे इथं आंबेडकर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी उत्साहात बाबासाहेबांची जयंती साजरी केली. बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी आंबडवेच्या स्फूर्ती भूमीत अनुयायीदेखील मोठ्या संख्येनं अनुन्यायी दाखल झाले आहेत.
Hadapsar News Bureau.
