It is clear that the suspicious items at Pune railway station were not explosives or gelatin sticks
पुणे रेल्वे स्थानकातील संशयास्पद वस्तू स्फोटकं अथवा जिलेटीनच्या कांड्या नसल्याचं स्पष्ट
पुणे : पुणे रेल्वे स्थानकात आज सकाळी साडे दहाच्या सुमारास संशयास्पद वस्तू आढळून आल्यामुळे गोंधळ उडाला होता. परंतु तपासाअंती कोणत्याही प्रकारची स्फोटकं अथवा जिलेटीनच्या कांड्या
संशायस्पद वस्तू आढळल्यानं पुणे स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक काही काळासाठी थांबवली होती.
रेल्वे प्रशासनानं तातडीनं पुणे पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं संशायास्पद वस्तू घटनास्थळावरून हटवल्या. त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात कोणत्याही प्रकारची स्फोटकं नसल्याचं स्पष्ट झालं.
हडपसर मराठी बातम्या
