DGGI-MZU busts Fake GST ITC of ₹35.11 Crores
जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने 35.11 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरण उघडकीस आणले
मुंबई : वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने, शनिवार, 2 जुलै 2022 रोजी मे. इमेंसा मल्टीव्हेंचर्स प्रा. लि.आणि इतर सहा कंपन्यचे
वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ‘तपासादरम्यान गोळा केलेल्या विविध दस्तावेज पुराव्यांच्या आधारे हे निश्चित झाले आहे कि अमनपुनीतसिंग कोहली हा या फसवणुकीमागचा मुख्य सूत्रधार होता आणि त्याने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्याच्या हेतूने या 14 कंपन्या सुरु केल्या होत्या. दिल्ली आणि मुंबई येथे असलेल्या शेल कंपन्यांकडून त्याच्याद्वारे संचालित 14 कंपन्यांच्या नावाने खोट्या पावत्या मिळवणे आणि त्याआधारे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणे ही पद्धत या प्रकरणात अवलंबली होती. अमनपुनीत सिंग कोहलीने त्यांच्या 14 कंपन्यांमध्ये अंदाजे 35.11 कोटी रुपयांचा अवैध आयटीसी जमा केल्याचा आरोप आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, ‘अमनपुनीत सिंग कोहली मालाच्या निर्यातीचा दावा करून हा आयटीसी मिळवेल आणि त्यानंतर आयजीएसटी परतावा मिळवेल. अमनपुनीत सिंग कोहली याने मिळवलेल्या आयजीएसटी परताव्याची एकूण रक्कम 17.09 कोटी रुपये इतकी (अंदाजे) आहे.
महासंचालनालयानुसार, तपासादरम्यान, अमनपुनीत सिंग कोहली याने अजिबात सहकार्य केले नाही आणि त्याला अनेकदा समन्स बजावूनही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहिला नाही. त्यानंतरच्या तपासात असेही समोर आले की अमनपुनीत सिंग कोहली त्याच्या ज्ञात पत्त्यांवरून फरार झाला होता आणि तो सापडला नाही. आंतर-संस्थांचे सहकार्य , समन्वय आणि निरंतर प्रयत्नांमुळे त्याचा थांगपत्ता शोधता आला.
अमनपुनीत सिंग कोहलीला COFEPOSA कायदा, 1974 अंतर्गत एका वर्षासाठी ताब्यात घेण्यात आले आणि इतर संस्थांकडूनही त्याची चौकशी सुरु आहे.
या प्रकरणी वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या मुंबई विभागाकडून पुढील तपास सुरु आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

