Account allocation of state cabinet announced
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास,
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:
- सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
- सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
- चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
- डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
- गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
- गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
- दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
- संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
- सुरेश खाडे- कामगार
- संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
- उदय सामंत- उद्योग
- प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
- रवींद्र चव्हाण -सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अब्दुल सत्तार-कृषी
- दीपक केसरकर-शालेय शिक्षण व मराठी भाषा
- अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
- शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
- मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

