Rishi Sunak has been named the new Prime Minister of Britain
ब्रिटनमचे नवे प्रधानमंत्री म्हणून ऋषी सुनक यांचं नाव निश्चित
ब्रिटनमधे हुजूर पक्षाच्या नेतृत्वाच्या स्पर्धेतून पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्यामुळे माजी अर्थमंत्री 
सुनक यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं मॉर्डंट यांनी सांगितलं. पक्षाच्या नव्या नेत्यासाठी फक्त एकच नामांकन आलं असल्यानं सुनक हेच पक्षाचे नवे नेते असतील, असं सर ग्राह्यम ब्रॅडी यांनी जाहीर केलं.
हुजूर पक्षाच्या संसद सदस्यांनी टेबल वाजवत हर्षोद्गार काढले आणि या घोषणेचं स्वागत केलं. ४२ वर्षांचे सुनक हे ब्रिटनचे पहिले आशियाई प्रधानमंत्री बनतील. माजी प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन पायउतार झाल्यानंतर प्रधानमंत्री झालेल्या लीझ ट्रुस यांनी ६ आठवड्यातच राजीनामा दिल्यामुळे दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत सुनक यांच्या रुपात ब्रिटनला तिसरा प्रधानमंत्री लाभणार आहे.
सुनक हे भारतीय वंशाचे असून, १९६० च्या दशकात त्यांच्या पालकांनी पूर्व अफ्रिकेतून ब्रिटनला स्थलांतर केलं. १२ मे १९८० रोजी सुनक यांचा जन्म झाला. सुनक यांनी ऑक्सफर्डच्या लिंकन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. फुलब्राइट स्कॉलर म्हणून त्यांनी कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले. सुनक हे वेस्टमिन्स्टरमधील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती ह्यांची संपत्तीसह 730 दशलक्ष पौंडांची एकत्रित संपत्ती आहे.
ते २०१५ पासून संसदेचे सदस्य आहेत. २०१९-२० या काळात ते चीफ सेक्रेटरी टू द ट्रेझरी या ब्रिटनच्या मंत्रीमंडळातल्या तिसऱ्या स्थानावर होते. तर, २०२० ते २२ चॅन्सलर ऑफ द एक्सचेकर म्हणजे दुसऱ्या स्थानावर होते.
कोविड महामारी आणि तिच्या आर्थिक परिणामांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांमधे ते प्रामुख्यानं पुढं होते. आर्थिक धोरणांबाबत जॉन्सन यांच्याशी मतभेद झाल्यानं ५ जुलै २०२२ ला त्यांनी राजीनामा दिला. जॉन्सन पायउतार झाल्यानंतर हुजूरपक्षाच्या नेतृत्वासाठी झालेल्या निवडणुकीत ते ट्रुस यांच्याकडून पराभूत झाले होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

One Comment on “ब्रिटनमचे नवे प्रधानमंत्री म्हणून ऋषी सुनक यांचं नाव निश्चित”