World’s first 200-meter-long roadside bamboo barrier (crash barrier), “Bahu Bally
जगातील सर्वात पहिले 200 मीटर लांब रस्त्याकडेचे बांबूचे कठडे (क्रॅश बॅरीयर), “बाहु बल्ली
महाराष्ट्रात विदर्भातील वणी-वरोडा महामार्गावर जगातील सर्वात पहिले 200 मीटर लांब रस्त्याकडेचे बांबूचे कठडे (क्रॅश बॅरीयर), “बाहु बल्ली उभारण्यात आले

‘बाहु बल्ली’ असं नाव दिलेल्या, या बांबूच्या कुंपण्याचा टिकावूपणा तपासण्यासाठी इंदूरमधल्या पिथमपूर येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स (NATRAX) सारख्या विविध सरकारी संस्थांमध्ये अनेक कठोर परीक्षा घेण्यात आल्या.रुरकी इथल्या इमारत संशोधन संस्था (CBRI) सेंट्रल येथे आयोजित केलेल्या आगनिरोधक चाचणीत या कुंपणाला प्रथम श्रेणी मिळाली. तसेच, इंडियन रोड काँग्रेसनेही त्याला मान्यता दिली आहे. बांबू कुंपणाचे पुनर्वापर मूल्य 50-70 टक्के आहे तर स्टीलच्या कुंपणाचे पुनर्वापर मूल्य 30-50 टक्के आहे.
बांबुसा बालकोआ या बांबूच्या प्रजातीपासून, हे कुंपण बनवण्यात आले आहे. डांबरापासून बनवलेल्या क्रिओसोट या लाकूड रक्षक तेलाने त्यावर प्रक्रिया केली गेली आहे. तसेच हाय-डेन्सिटी पॉली इथिलीनचे लेपन त्यावर करण्यात आले आहे.
बांबूचे हे मजबूत कठडे तयार करण्यात आलेले यश बांबू क्षेत्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी उल्लेखनीय आहे, कारण हा क्रॅश बॅरियर स्टीलला एक परिपूर्ण पर्याय ठरू शकेल आणि पर्यावरणविषयक प्रश्नावरही त्यामुळे उत्तर मिळू शकेल. त्याशिवाय, हा एक कृषीसंलग्न ग्रामीण व्यवसाय म्हणून देखील उपयुक्त ठरू शकेल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com


One Comment on “जगातील सर्वात पहिले 200 मीटर लांब रस्त्याकडेचे बांबूचे कठडे “बाहु बल्ली”