Calling for Sportsmen to Apply for Shiv Chhatrapati State Sports Award
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांतर्गत २०१९- २०, २०२०-२१ व २०२१-२२ च्या पुरस्कारांसाठी ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात त्यामध्ये सहभागी, प्राविण्यप्राप्त खेळाडूंनी ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सहसंचालक क्रीडा व युवक सेवा चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे.
क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागा
फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्यामुळे काही खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९- २०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षाकरीता अर्ज सादर करू शकले नाहीत. यास्तव अशा खेळाडूंचे नुकसान होऊ नये व खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अशा खेळाडूंनी त्यांचे प्रस्ताव व विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत.
पुरस्कारासाठीचे अर्ज आणि माहिती क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहितीही क्रीडा विभागाने दिली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
