Savitribai Phule Pune University Salute to Khashaba Jadhav
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन
राज्य क्रीडा दिवसानिमित्त ‘फिट इंडिया विक’चे उद्धाटन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पै. खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पै. खाशाबा जाधव यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग कळाकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र शासनाने ऑलिम्पिक पदक विजेते पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार आज पहिला ‘राज्य क्रीडा दिवस’ असून यानिमित्त विद्यापीठात ‘फिट इंडिया विक’चे उद्धाटनही करण्यात आले.
या विकमध्ये विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार, पुश-अप्स, फुटबॉल, एरोबिक्स, धावण्याची शर्यत, गोळा फेक, मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी विभागातील विद्यार्थी श्री. निखील सुर्यवंशी यांनी उपस्थितांना पै. खाशाबा जाधव यांची जीवन प्रवासाची व पदक मिळवताना केलेल्या कष्टाची, संघर्षाची माहिती दिली. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे विभागप्रमुख डॉ. विष्णू पेठकर, सहायक प्राध्यापक डॉ. सुमन पांडे, डॉ. अभिजित कदम, डॉ. दादासाहेब ढेंगळे, सहायक श्री. दिपक घोळे व इतर शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com



One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन”