A man who cultivates pantheism should be born from the society
सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा.
पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त ज्येष्ठ लेखक संपादक मा.संजय आवटे यांचे विचार.
हडपसर : भारत हा सर्वधर्मसमभाव जोपासणारा देश आहे. प्रत्येक रयत सेवकाने व विद्यार्थ्यांनी कर्मवीरांनी दिलेल्या मूल्यांचे जतन करण्याचा हा काळ आहे. 
महापुरुषांना जाती धर्मात बांधू नका. आपण सर्व माणूस होण्याचा प्रयत्न करू या. जातीचा अंत झाला तरच भारत महान होईल. भव्य दिव्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला थोर पुरुषांचे विचार समजावून सांगितले तर संस्कारित पिढी तयार होईल. हीच पिढी भारत राष्ट्र बलवान बनवेल. कर्मवीरांचा समतेचा मानवतेचा विचार रुजवूया , असे विचार प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखक संपादक मा. संजय आवटे यांनी एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील जयंती प्रसंगी मांडले.
एस. एम. जोशी कॉलेज व रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर जयंतीप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.आमदार चेतन तुपे यांनी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य मा. दिलीप तुपे होते. ते म्हणाले की, आपण कर्मवीरांचे कार्यकर्ते आहोत.कर्मवीरांच्या संस्काराने सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस घडत आहे . ज्ञानदान करणारा रयत सेवक उत्तम आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन .एस . गायकवाड,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर आबा तुपे, आजीव सभासद लालासाहेब खलाटे, साधना शैक्षणिक संकुलाचे सर्व शाखाप्रमुख सुजाता कालेकर , झीनत सय्यद , रोहिणी सुशीर ,लक्ष्मी आहेर ,उपप्राचार्य योजना निकम व सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवेक , विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. एन .एस . गायकवाड यांनी केले. या समारंभात प्रोफेसरपदी निवड झाल्याबद्दल डॉ. किशोर काकडे, डॉ. राजेंद्र ठाकरे आणि पेटंट मिळाल्याबद्दल डॉ. एकनाथ मुंडे, डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. अतुल चौरे इत्यादींचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री, डॉ. विश्वास देशमुख यांनी केले. प्राचार्या सुजाता कालेकर यांनी आभार मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
