Ban on Single-Use Plastic comes into force in the country from today
१ जुलै २०२२ पासून देशात एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी लागू
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आजपासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. याअंतर्गत आता प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू मिळणे बंद
सिंगल यूज प्लास्टिक अंतर्गत येणाऱ्या वस्तूंमध्ये प्लास्टिकच्या काड्या, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठी पॉलिस्टीरिन (थर्मोकोल), प्लास्टिक प्लेट्स, प्लास्टिक कप आणि प्लास्टिकचे ग्लास आणि प्लास्टिक कटलरी यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या, तर ३० सप्टेंबर २०२१पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह इतर प्लास्टिक वस्तूंवर बंदी लागू करण्यात आलेली आहे. आजपासून सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
नव्या नियमांतर्गत ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे, त्या वस्तूंची यादीकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं जाहीर केली आहे. सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो किंवा फेकून देऊ शकतो आणि ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

One Comment on “१ जुलै २०२२ पासून देशात एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी लागू”