Awareness about the concept of ‘Forest Control and Biodiversity’ through Chitraratha.
चित्ररथाच्या माध्यमातून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ संकल्पनेबाबत जनजागृती.
पुणे : जिल्हा माहिती कार्यालय पुणे मार्फत जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ या संकल्पनेवर आधारीत जनजागृती करण्यात येत आहे. चित्ररथ आणि
जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील गावात ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ बाबत संदेश देण्यात येत आहे. बोरी, बेल्हे, पेठ, बरोदा, उंब्रज, वडगाव, ओतुर, झर, राजुरी, आणे, नारायणगाव, काले, गावडेवाडी, सोमटवाडी,धामणी तसेच कुसुर येथे जनजागृती चित्ररथाला ग्रामस्थांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. माहितीपटाच्या माध्यमातून चांगली माहिती मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चित्ररथ आणि एलईडी वाहन जिल्ह्यातील वनक्षेत्र अधिक असलेल्या भागातील प्रत्येकी ३०० पेक्षा अधिक गावातून फिरणार आहे. संकल्पनेशी संबंधित ५ विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहे. त्यात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, डॉ.महेश गायकवाड यांच्या संदेशाचादेखील समावेश करण्यात आला आहे.
