In the wake of freezing the name and symbol of Shiv Sena, the movement of both the groups has accelerated
शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या हालचालींना वेग
शिंदे गटानं धनुष्यबाण चिह्नावर दावा सांगणारा अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केला होता. त्याच्या समर्थनार्थ दाखल झालेले दस्तऐवज तसंच ठाकरे गटाने
पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे आणि शिंदे गटासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. दोन्ही गट कोणतं नाव आणि चिन्ह निवडणार याबद्दल राज्याला उत्सुकता आहे.
दोन्ही गटांना शिवसेना नाव वापरता येणार नाही. मात्र त्यांना शिवसेनेशी संबंधित नाव वापरता येईल. त्यामुळे शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) अशी नावं घेतली जाऊ शकतात.
गेल्या वर्षी लोकजनशक्ती पक्षात फूट पडली. या पक्षाची स्थापना रामविलास पासवान यांनी केली. पासवान यांचे पुत्र चिराग पासवान आणि पासवान यांचे बंधू पशुपती पारस यांच्यामध्ये पक्ष विभागला. त्यावेळी त्यांनी राष्ट्री लोक जनशक्ती पक्ष आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) अशी नावं घेतली होती.
दोन्ही गटांनी आपापली पर्यायी नावं आणि चिन्हं आयोगासमोर उद्या दाखल करावी असे निर्देश आयोगाने दिले आहेत. या निर्णयानंतर दोन्ही गटांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
निवडणूक आयोगाचा गैरवापर होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी केला तर खरी शिवसेना शिंदे गटाचीच असून बहुसंख्य आमदार आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा शिंदे गटाला असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना न्यायालयात दाद मागण्याची तयारी करत असल्याचं वृत्त आहे. पुढच्या हालचाली ठरवण्यासाठी आज मुंबईत दोन्ही गटांच्या बैठका होणार आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com


One Comment on “शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या हालचालींना वेग”