Union Health Ministry issues guidelines for managing monkey pox disease
मंकी पॉक्स आजाराचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दिशा निर्देश जारी
मंकीपॉक्सची लक्षणे

एखाद्या व्यक्तीला ताप आणि शरीरावर लाल पुरळ यासारखी मंकी पॉक्स आजार सदृश लक्षणं आढळून आली तर त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसंच ज्या व्यक्ती मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशात जाऊन आले आहेत आणि या आजाराचा संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी देखील जवळच्या आरोग्य केंद्रात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असं आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनांमध्ये म्हटलं आहे.
मंकीपॉक्सची लक्षणे –
मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर, रुग्णाला ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि सामान्य सुस्ती ही लक्षणे दिसतात. तापाच्या वेळी अत्यंत खाज सुटणारी पुरळ उठू शकते, जी अनेकदा चेहऱ्यावर सुरू होते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते. संसर्ग साधारणपणे 14 ते 21 दिवस टिकतो. मंकीपॉक्स विषाणू त्वचा, डोळे, नाक किंवा तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. हे संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा त्याचे रक्त, शरीरातील द्रव यांना स्पर्श करून प्रसारित होऊ शकतो. संक्रमित प्राण्याचे मांस खाल्ल्याने देखील मंकीपॉक्स होऊ शकतो.
hadapsarinfomedia@gmail.com

One Comment on “मंकी पॉक्स आजाराचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दिशा निर्देश जारी”