Memorandum of Understanding between Mahaprit and Pune Municipal Corporation for energy-saving project
उर्जा बचत प्रकल्पासाठी ‘महाप्रित’चा पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार
पुणे : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामहामंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादीत (महाप्रित) या सहयोगी कंपनीने आज पुणे
या सामंजस्य करारावर ‘महाप्रित’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी आणि पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
स्वयंरोजगार निर्मितीसंदर्भात दुर्बल घटकांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून उर्जा वापराच्या खर्चात बचत करण्याची योजना या प्रकल्पामध्ये आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि ‘शून्य कार्बन’ उद्दिष्ट गाठण्यासाठी पारंपारिक उर्जेच्या जागी सौर उर्जा निर्मिती हे देखील या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
‘महाप्रित’चा हा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत झालेला हा राज्यातील पहिल्याच संयुक्त उपक्रमाचा करार आहे. या उपक्रमाचा पुणे शहरासह समाजातील दुर्बल घटकांनाही उपयोग होणार आहे.
स्थानिक नवोद्योजकांपैकी (स्टार्ट अप आंत्रप्र्यूनर्स) पात्र आणि कल्पक नवोद्योगांची निवड करुन त्यांना प्रोत्साहन व सहाय्य देण्याचीही या प्रकल्पाची कल्पना आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच ऊर्जा खर्चात बचत करण्यासाठी राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही असे प्रकल्प हाती घेण्यास त्यामुळे चालना मिळेल.
यावेळी बिपीन श्रीमाळी म्हणाले, या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचतीद्वारे भविष्यात पुणे महानगरपालिकेच्या विद्युत देयकांच्या खर्चातही बचत होईल.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता (विद्युत) श्रीनिवास कुंदल, अधिक्षक अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, ‘महाप्रित’चे संचालक (संचलन) विजयकुमार काळम पाटील, कार्यकारी संचालक (प्रशासन) प्रशांत गेडाम, मुख्य महाव्यवस्थापक श्यामसुंदर सोनी, सतीश चवरे, गणेश चौधरी, विरेंद्र जाधवराव, पंकज शहा, प्रसाद दहापुते आणि जनसंपर्क अधिकारी मिलिंद अवताडे उपस्थित होते.
Hadapsar News Bureau.
