The National Investigation Agency arrested two members of the Dawood gang
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या दोन हस्तकांना आज मुंबईत अटक केली. आरिफ अबू बक्र शेख आणि शब्बीर अबू बक्र शेख अशी त्यांची नावं असून, मुंबईच्या पश्चिम
अटक करण्यात आलेले आरोपी हे मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील रहिवासी असून त्यांना शुक्रवारी एनआयए न्यायालयात हजर करण्यात येणार होते. एनआयएने मुंबई आणि शेजारील मीरा भाईंदरमधील 29 ठिकाणी छापे टाकले आणि 21 जणांची चौकशी केली.
एनआयएने फेब्रुवारीमध्ये इब्राहिम, त्याचा भाऊ अनीस आणि छोटा शकील, टायगर मेमन यांसारख्या जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध शस्त्रास्त्रांची तस्करी, नार्को-दहशतवाद, मनी लाँड्रिंग, बनावट नोटा प्रसारित करणे आणि दहशतवादी निधी पुरवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या नोंदींचा हवाला देऊन कळवलं आहे, की दाऊद टोळीसाठी काम करणारी मोठी यंत्रणा सीमापार सक्रीय असल्याचं एनआयच्या तपासात आढळलं आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला एनआयएनं मुंबई आणि मीरा रोड-भायंदर आयुक्तालयाच्या हद्दीत चोवीस ठिकाणी छापे टाकले होते. तसंच एकवीस संशयितांना अटक केली आहे. गेल्या फेब्रुवारीतही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.
