The combined time table of all the universities will be announced
सर्व विद्यापीठांचे एकत्रित वेळापत्रक जाहीर करणार
– उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
नागपूर : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे, निकाल लागण्याचे एकत्रित वेळापत्रक तयार करुन जाहीर करण्यात येईल, असे उच्च व तंत्र सिक्षणामंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान सभेत आज एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.
सन 2022-23 मध्ये एल एल बी अभ्यासक्रमासाठी राज्य सामाइक प्रवेश परीक्षेसाठी उशीरा प्रवे
श्री. पाटील पुढे म्हणाले, “राज्यातील विविध विद्यापीठे हे वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेतात व निकाल जाहीर करतात. त्यामुळे सामायिक प्रवेश परीक्षेची तारीख बदलत जाते. या सर्व विद्यापिठांच्या पद्धतीमध्ये एकसूत्रता यावी, यासाठी राज्यपाल महोदयांच्या दालनात एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे.
मे महिन्याच्या परीक्षा घेण्यात याव्यात आणि जून अखेर निकाल लावून एक ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन महाविद्यालये सुरु करावीत, अशा सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत”.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

