India is committed to eradicating disposable plastic items – Narendra Modi
एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूचं निर्मूलन करण्यासाठी भारत कटीबद्ध – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूचं निर्मूलन करण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज एक महासागर परिषदेला
किनारी भागात प्लास्टिक आणि इतर वस्तूंचा कचरा साफ करण्यासाठी भारतानं नुकतीच राष्ट्रव्यापी जागृती मोहिम चालवली. त्यात ३ लाख लोकांनी सुमारे १३ टन प्लास्टीक कचरा गोळा केला, असं त्यांनी सांगितलं.
भारतात सागरी संस्कृती पूर्वापासून आहे. आणि आज आपली सुरक्षा आणि समृद्धी महासागराशी जोडलेली आहे. भारताच्या “भारत-प्रशांत महासागर पुढाकारात” सागरी संसाधनं हा प्रमुख स्तंभ आहे. एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टीकबाबत जागतिक मोहिम सुरु करण्यात फ्रान्ससोबत सहभागी व्हायला आम्हाला आनंदचं होईल, असं मोदी म्हणाले.

One Comment on “एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूचं निर्मूलन करण्यासाठी भारत कटीबद्ध – नरेंद्र मोदी”