Mortal remains of Queen of Melody consigned to flames with full state honours.
सूरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
सूरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ९२ वर्षाच्या होत्या. कोरोना संसर्ग आणि न्यूमोनियामुळे ८ जानेवारीपासून त्या रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज
लता मंगेशकर यांचे पार्थिव देह शिवाजी पार्क इथं आणल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवरांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र वाहिलं.
शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, गायक शंकर महादेवन,गीतकार जावेद अख्तर, अभिनेता शाहरुख खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
