The program ‘Concert for Change’ will conclude the ‘Mumbai Festival 2024’ tomorrow
‘कान्सर्ट फॉर चेंज’ या कार्यक्रमाने होणार ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ ची उद्या सांगता

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत’ मुंबई फेस्टिव्हल 2024′ मुंबई येथे दि. 20 ते 28 जानेवारी दरम्यान सुरू आहे. या फेस्टिव्हलचा समारोप एमएमआरडीए मैदान क्र. 5 व 6 वांद्रे येथील महा मुंबई एक्सापो प्रदर्शनीमध्ये ‘कॉन्सर्ट फॉर चेंज’ या कार्यक्रमाने होणार आहे.
या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद मंहिद्रा, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा उपस्थित राहणार आहेत.
‘कॉन्सर्ट फॉर चेंज’ या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा, सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, अभिनेत्री परिणीती चोप्रा, सोनाली कुलकर्णी हे कलाकार सहभाग घेणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com


One Comment on “‘कान्सर्ट फॉर चेंज’ या कार्यक्रमाने होणार ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ ची उद्या सांगता”