PM Narendra Modi on a two-day visit to Gujarat
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर
अहमदाबाद: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज सकाळी त्यांचं अहमदाबाद विमानतळावर आगमन झालं. गुजरातचे राज्यपाल आचार्य
अहमदाबाद विमानतळापासून ते गांधीनगर इथल्या भाजपा मुख्यालयापर्यंत आयोजित नऊ किलोमीटरच्या रोड शो मध्ये प्रधानमंत्री सामील झाले असून रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांनी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी गर्दी केली आहे. युक्रेन मधून सुखरूप परतलेले गुजरातमधले विद्यार्थी आणि त्यांचे पालक देखील उपस्थित आहेत. प्रधानमंत्र्यांच्या रोड शो च्या पुढे काही विद्यार्थी सांस्कृतिक नृत्य सादर करत आहेत.
कोविड संकटकाळानंतर २ वर्षांनी प्रधानमंत्री गुजरातला आल्यानं, राज्यात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. त्यानंतर या दौऱ्यात प्रधानमंत्री गुजरात पंचायत महासंमेलनात पंचायत राज संस्थेतल्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहेत.
उद्या पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचं लोकार्पण होणार आहे. या विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. त्यानंतर सरदार पटेल क्रीडांगणात आयोजित “खेल महाकुंभ” या क्रीडा संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत होईल. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी ४७ लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. या खेल महाकुंभात राज्यभरातील ५०० हून अधिक ठिकाणी विविध खेळांचं आयोजन करण्यात येणार आहे.
