RBI Deputy Governor T Ravi Shankar advises investors to be cautious about cryptocurrency
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रवी शंकर यांचा गुंतवणूकदारांना क्रिप्टो करन्सी बाबत सावध राहण्याचा सल्ला
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रवी शंकर यांनी गुंतवणूकदारांना क्रिप्टो करन्सी बाबत सावध केलं आहे. क्रिप्टो करन्सी तंत्रज्ञान हे सरकारी नियम आणि नियंत्रित वित्तीय प्रणालीतून
क्रिप्टो करन्सी आर्थिक एकात्मतेला छेद देणारी असून त्यात ग्राहकाची माहिती जाणून घेण्याबाबत पारदर्शकता नाही तसंच त्याद्वारे समाज विघातक गोष्टींना अर्थपुरवठा केला जाऊ शकतो, असं टी रबी शंकर यांनी सांगितलं. यासंदर्भात आर बी आय चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही नुकतंच गुंतवणूकदारांना दक्ष राहण्याचं आवाहन केलं होतं. तर केंद्र सरकार क्रिप्टो करन्सीवर ३० टक्के कर आकारणार असल्याचं सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलं होतं.
