Commemoration program of Sant Savata Maharaj in Hadapsar
हडपसरमध्ये संत सावता महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम
पुणे: विज्ञानिष्ठ विचारांची सांगड घालीत कामातच देवत्व पाहणारे 12 व्या शतकातील संत सावता महाराज यांचा ७२८वा स्मृतिदिन सोहळा उत्साहात झाला.
ह.भ.प. कोल्हे महाराज यांची कीर्तन सेवा सकाळी 10 ते 12.30 दरम्यान झाली. दरम्यान, मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला.
हडपसर पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. वरुणराजाने दुपारी दमदार हजेरी लावली. हडपसरमधील जुन्या मंदिरांपैकी संत सावता महाराजांचे एक महत्त्वाचे मानले जाणारे मंदिर आहे. या मंदिरामध्ये १९४९ मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंदिर ट्रस्ट उत्सवाचे हे ७३ वे वर्ष आहे, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

