Provisional Selection List Released for Armed Police Recruitment
सशस्त्र पोलीस भरतीसाठी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध
गैरहजर राहिलेल्या ३२ उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येणार
पुणे : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया २०२१ अंतर्गत तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी www.mahapolice.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे समादेशक विनीता साहू यांनी कळविले आहे.
उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची २ व ३ ऑगस्ट २०२३ रोजी पडताळणी करण्यात आली. गैरहजर राहिलेल्या ३२ उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येणार असून त्यांनी ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता सर्व मूळ कागदपत्र, सत्यप्रत असलेले छायांकित प्रतीचे दोन संच व छायाचित्रासह उपस्थित रहावे. नियोजित दिवशी वेळेत उपस्थित न राहिल्यास उमेदवारांना सशस्त्र पोलीस शिपाई पदाची आवश्यकता नाही असे गृहीत धरुन निवड रद्द करण्यात येईल. तसेच या पदाबाबत उमेदवाराचा कोणताही आक्षेप विचारात घेतला जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com


One Comment on “सशस्त्र पोलीस भरतीसाठी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध”