State Government announces Literature Award, Bharat Sasane Lifetime Achievement Award.
राज्य सरकारचे वाड्मय पुरस्कार जाहीर, भारत सासणे यांना जीवन गौरव पुरस्कार.
मुंबई: साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या वाड्मय पुरस्कांची घोषणा आज झाली. यावर्षी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
श्री. पु. भागवत पुरस्कार लोकवाड्मय गृह, मुंबई, या संस्थेला मिळाला आहे. तीन लाख रुपये रोख, मानचिन्ह, आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे. दोन लाख रुपयांचा डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास व्यक्तिगत पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर झाला आहे. मराठी भाषा संवर्धक व्यक्तिगत पुरस्कार डॉ. चंद्रकांत पाटील यांना, तर डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर झाला आहे. कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संस्थेसाठी मराठी भाषा अभ्यास केंद्र, मुंबई यांना मिळाला आहे. हे पुरस्कार प्रत्येकी दोन लाख रुपयांचे आहेत.
यावेळी यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. त्यात कवितेसाठी हेमंत दिवटे, नाटक-जयंत पवार, कादंबरी- भीमराव वाघचौरे, लघुकथा-माधव जाधव, ललित-गद्य अरुण खोपकर, विनोद-सॅबी परेरा, आत्मचरित्रं-शाहू रसाळ , समीक्षा- गंगाधर पाटील, समाजशास्त्र- उत्तम कांबळे, इतिहास- शशिकांत पित्रे, भाषाशास्त्र-औदुंबर सरवदे, विज्ञान- डॉ बालकोंडके, उपेक्षितांचं साहित्य- अनंत केदारे, मानसशास्त्र-डॉ शोभा पाटकर, शिक्षणशास्त्र-डॉ राणी बंग आणि करुणा गोखले, पर्यावरण- डॉ मृदुला बेळेे, संपादित- राम जगताप आणि भाग्यश्री भागवत, अनुवादित मिलिंद चंपानेरकर, संकीर्ण- धनंजय जोशी, तर सरफोजी राजे भोसले, बृहन्महाराष्ट्र पुरस्कार गजानन यशंवत देसाई यांनी जाहीर झाला आहे. हे पुरस्कार प्रत्येक एक लाख रुपयाचे आहेत.
