The country needs police officers with quality and knowledge of modern technology – Prime Minister
देशाला गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे – प्रधानमंत्री
गांधीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे आरआरयू अर्थात राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठाच्या इमारतीचे राष्ट्रार्पण केले आणि विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला देखील संबोधित
या कार्यक्रमात भाषणाला सुरुवात करतानाच पंतप्रधानांनी महात्मा गांधी आणि त्यांच्यासह दांडी यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. ही महान यात्रा आजच्याच दिवशी सुरु करण्यात आली होती. “ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्ध गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशाने दिलेल्या लढ्यामुळे ब्रिटीश सरकारला भारतीयांच्या सामुहिक शक्तीची जाणीव झाली,”, असे पंतप्रधान म्हणाले.
देशाला गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता असून त्यासाठी अद्ययावत प्रशिक्षणाची गरज आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
लोकशाही व्यवस्थेत जनतेला केंद्रस्थानी मानून समाजात ऐक्य आणि सद्भाव कायम राहावं या कार्यात पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. समाजविघातक शक्तींशी कठोरपणे आणि जनतेशी आपुलकीनं वागून पोलीस जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात, कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या सेवेमुळे त्यांच्यातला मानवीय चेहरा समोर आला, ही प्रतिमा अशीच कायम राहावी यासाठी पोलिसांनी सदैव दक्ष राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. पोलिसांना येणारा कामाचा ताण दूर करण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठानं विशेष प्रशिक्षित तयार करावेत, असंही ते म्हणाले. सुरक्षा दलांसाठी तंत्रज्ञान हे एक नवीन हत्यार असून वाढते सायबर गुन्हे रोखण्यासह इतर सर्व कारवायांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असं त्यांनी सांगितलं. तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी आज गांधीनगरमध्ये रोड शो केला. खुल्या जीपमधून प्रवास करत त्यांनी नागरिकांना अभिवादन केलं.
आरआरयूमध्ये पोलीस कार्यातील तसेच अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील पोलीस विज्ञान आणि व्यवस्थापन, गुन्हेगारी कायदा आणि न्याय, सायबर मानसशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सायबर सुरक्षा, गुन्ह्यांचा तपास, धोरणात्मक भाषा विकसन, अंतर्गत संरक्षण आणि त्याविषयीची धोरणे, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा तसेच तटवर्ती आणि सागरी सुरक्षा अशा विविध विषयांमध्ये पदविका ते डॉक्टरेट पातळीपर्यंतचे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
