पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये भूकंप, किमान १३ लोकांचा मृत्यू

6.0 magnitude earthquake hits Kathmandu नेपाळच्या काठमांडूमध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Earthquake in Pakistan, Afghanistan, at least 13 dead

पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये भूकंप, किमान १३ लोकांचा मृत्यू

पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील भूकंपात किमान १३ लोकांचा मृत्यू तर २०० हून अधिक जखमी

6.0 magnitude earthquake hits Kathmandu नेपाळच्या काठमांडूमध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Image by Shutterstock.com

इस्लामाबाद/काबूल/नवी दिल्ली : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधे झालेल्या भूकंपात एकूण १३ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात पाकिस्तानचे ९ तर अफगाणिस्तानचे ४ जण आहेत, या भूकंपात २०० हून अधिकजण जखमी झाले. भूकंपामुळे इमारतींचे नुकसान झाले, भूस्खलन झाले आणि काल संध्याकाळी लोक रस्त्यावर धावत आले.

अफगाणिस्तानमध्ये काल रात्री १० वाजून १७ मिनिटांनी हिंदू कुश भागात भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६ पूर्णांक ६ दशांश अशी नोंदली गेली. राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र १५६ किलोमीटर खोल होते.

अफगाणिस्तानच्या बहुतांश भागात तसेच पाकिस्तानच्या मोठ्या भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, झेलम, शेखूपुरा, स्वात, नौशेरा, मुलतान, स्वात, शांगला यासह पाकिस्तानातील विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले.

इस्लामाबाद मध्ये घराची पडझड

दुर्गम भागात किमान 19 मातीची घरे कोसळली, असे वायव्येकडील प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते तैमूर खान यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘आम्ही अजूनही नुकसानीची आकडेवारी गोळा करत आहोत.’ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील या शक्तिशाली भूकंपामुळे अनेकांना घरे आणि कार्यालये सोडून पलायन करावे लागले.

या भूकंपाचे धक्के भारतासह तुर्कमेनिस्तान, किरगिझीस्तान, पाकिस्तान, ताजिकीस्तान, उझबेकीस्तान, कझाकस्तान, चीन या देशांमध्येही जाणवले. उत्तर भारतात दिल्ली-एनसीआर, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठे धक्के जाणवले.या धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली. लोक घरांच्या बाहेर पडले.

अफगाणिस्तान भूकंपाचा केंद्र बिंदू

यूएस जिओलॉजिकल सर्व्हिसेसच्या मते, ६.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या जुर्मपासून ४० किमी आग्नेयेला होता. भूकंप सुमारे १९० किमी खोलीवर झाला. भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने 10.17.27 वाजता (IST) भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी मोजली. त्याचे केंद्र उत्तर अफगाणिस्तानमधील फैजाबादच्या दक्षिण-पूर्वेस १३३ किमी अंतरावर १५६ किमी खोलीवर होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *