आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Online registration for Indian Army recruitment भारतीय लष्कराकडून भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

Call to apply till March 22 for Army Agniveer and regular recruitment

आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पहिल्या टप्प्यात उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यकOnline registration for Indian Army recruitment भारतीय लष्कराकडून भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

पुणे : भारतीय सैन्यात आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी १३ फेब्रुवारी रोजी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिसूचना अपलोड करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर २२ मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सैन्य भरती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या भरती प्रक्रियेत अग्निवीर जी.डी., अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर कार्यालय सहाय्यक, १० वी व ८ वी उत्तीर्णांसाठी अग्निवीर ट्रेड्समॅन, अग्निवीर महिला सैनिकी पोलिस यांचा तसेच नर्सिंग असिस्टंट/शिपाई फार्मासाठी नियमित भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरील अधिसूचना तपशीलवार वाचावी. विषय अधिसूचनेनुसार एनसीसी उमेदवार, तांत्रिकदृष्ट्या पात्र व्यक्ती, उत्कृष्ट खेळाडू आणि माजी सैनिकांच्या मुलांना बोनस गुण आणि शारीरिक मोजमापातील सूट दिली जाईल. याबाबतचा तपशिल अधिसूचनेत दिलेले आहेत.

लेखी परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना संबंधित सैन्य भरती कार्यालयाद्वारे भरती मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल. उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीपूर्वी त्यांना अनुकूलता चाचणीला सामोरे जावे लागेल. या चाचणीचा भरती प्रक्रियेत प्रथमच समावेश केला आहे. अनुकूलता चाचणीसाठी उमेदवारांनी रॅलीच्या ठिकाणी पुरेशी बॅटरी लाइफ आणि २ जीबी डेटा असलेला कार्यरत स्मार्टफोन आणणे आवश्यक आहे, असेही सैन्य भरती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन यांचं निधन

Spread the love

One Comment on “आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *