दोन राष्ट्रीय विक्रमांसह दिपाली गुरसाळेचे सोनेरी यश

Deepali Gursale's golden success with two national records दोन राष्ट्रीय विक्रमांसह दिपाली गुरसाळेचे सोनेरी यश हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Deepali Gursale’s golden success with two national records

दोन राष्ट्रीय विक्रमांसह दिपाली गुरसाळेचे सोनेरी यश

मुकुंद आहेरला रौप्य आणि शुभम तोडकरला कांस्य पदक

वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदकांची कमाई

गोवा : दिपाली गुरसाळेने गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांसह वेटलिफ्टिंगमधील सुवर्णपदक पटकावले. याचप्रमाणे मुकुंद आहेरने रौप्य आणि शुभम तोडकरने कांस्य पदक प्राप्त केले. कॅम्पल मैदानावर सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने तीन पदकांची कमाई केली.Deepali Gursale's golden success with two national records
दोन राष्ट्रीय विक्रमांसह दिपाली गुरसाळेचे सोनेरी यश
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

महिलांच्या ४५ किलो वजनी गटात दीपाली गुरसाळेने स्नॅचमध्ये ७५ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये ९० किलो असे एकूण १६५ किलो वजन उचलले. यातील स्नॅच ७५ किलो आणि एकूण वजन १६५ किलो असे दोन राष्ट्रीय विक्रम तिने नोंदवले. पश्चिम बंगालच्या चंद्रिका तरफदारीने एकूण १६२ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले. चंद्रिकाने क्लीन अँड जर्कमध्ये ९५ किलो वजनासह राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तर तेलंगणाच्या टी प्रिय दर्शिनीने (१६१ किलो) कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्राची आणखी एक स्पर्धक सारिका शिंगरेला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या ५५ किलो गटात आहेरने स्नॅचमध्ये ११२ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये १३७ किलो असे एकूण २४९ किलो वजन उचलले. या गटात सेनादलाच्या प्रशांत कोळीने सुवर्णपदकावर नाव कोरले. प्रशांतने स्नॅचमध्ये ११५ किलो आणि एकूण २५३ किलो वजन उचलून दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. २३० किलो वजन उचलणाऱ्या आंध्र प्रदेशच्या एस गुरू नायडूला कांस्यपदक मिळाले.

पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात शुभम तोडकरने २६३ किलो वजन उचलून कांस्य पदक संपादन केले. त्याने स्नॅचमध्ये ११५ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये १४८ किलो वजन उचलले. सेनादलाच्या चारू पेसीने २६७ किलोसह सुवर्ण आणि सिद्धांत गोगोईने २६६ किलोसह रौप्य पदक मिळवले.

महिलांच्या ४९ किलो वजनी गटात साक्षी मस्केची कामगिरी सातव्या क्रमांकाची ठरली, तर ५५ किलो गटात अनन्या पाटीलला पाचवा क्रमांक मिळाला.

दिपालीची कामगिरी कौतुकास्पद -अजित पवार

महाराष्ट्राची युवा वेटलिफ्टर दिपालीने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत दोन विक्रम आपल्या नावे केले आहेत. तिची हीच कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. यामुळे निश्चितपणे राज्यातील युवा खेळाडूंनाही यातून प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे दिपाली ही महाराष्ट्रातील सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. तिच्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिपालीवर कौतुकाचा वर्षाव केला.

रग्बी -महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी

रग्बी 7-एस स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी झाले. महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटकला ४८-० असे नामोहरम केले. तसेच पुरुष गटात महाराष्ट्राने बिहारचा १९-१२ असा पराभव केला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
मुंबईतील शासकीय रूग्णालयात सर्व वैद्यकीय चाचण्या उपलब्ध करून द्याव्यात
Spread the love

One Comment on “दोन राष्ट्रीय विक्रमांसह दिपाली गुरसाळेचे सोनेरी यश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *