देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या ५४ चिनी अँप्सवर सरकारनं बंदी घातली आहे.

Government bans 54 Chinese Apps posing threat to national security

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या ५४ चिनी अँप्सवर सरकारनं बंदी घातली आहे.

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या ५४ चिनी अँप्सवर सरकारनं बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं (MeitY) बंदी घालण्यात आलेल्या अँप्सची यादी जारी केली आहे.Ministry of Electronics & Information Technology यापैकी काही अँप्सवर सरकारनं यापूर्वीच बंदी घातली होती. पण त्यांना नवीन नावानं रिब्रॅन्ड आणि रीलॉन्च करण्यात आलं.

यामध्ये ब्युटी कॅमेरा: स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा – सेल्फी कॅमेरा, इक्वलायझर आणि बास बूस्टर, कॅमकार्ड फॉर सेल्सफोर्स एन्ट, आयसोलॅंड 2: अॅशेस ऑफ टाइम लाइट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ओन्मायोजी चेस, ओन्मायोजी अरेना, अँपलॉक आणि ड्युअल यांचा समावेश आहे.

54 अँप्सच्या यादीमध्ये अशा काही अँप्स समावेश आहे ज्यांवर यापूर्वी सरकारने बंदी घातली होती परंतु त्यांचे पुनर्ब्रँडिंग आणि नवीन नावाने पुन्हा लॉन्च करण्यात आले होते.

अधिकृत माहितीच्या आधारे ही अँप्स तयार करणाऱ्या मूळ देशाची माहिती मिळाल्यावर त्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी करण्यात आले. यापैकी अनेक अँप्सवर द्वेषभावपूर्ण माहिती प्रसारित होते तसंच वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय त्याच्याबाबतची माहिती चीनमधल्या डेटा सेंटर्सना पुरवली जाते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *