मोबाईल कव्हरेज नसणा-या २८ हजार गावांमध्ये थेट 4G मोबाईल सेवा

भ्रमणध्वनीसाठी  मनोरा  (Mobile Tower ) हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

Direct 4G mobile service in 28 thousand of villages without mobile coverage

मोबाईल कव्हरेज नसणा-या २८ हजार गावांमध्ये थेट 4G मोबाईल सेवा

कोणतेही मोबाईल कव्हरेज नसणा-या देशातील 28 हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट 4 जी मोबाईल सेवा देण्याची सुरुवात

मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांची माहिती4G mobile services started directly through BSNL in 28 thousand villages of the country where there is no mobile coverage
कोणतेही मोबाईल कव्हरेज नसणा-या देशातील 28 हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट 4 जी मोबाईल सेवा देण्याची सुरुवात 
हडपसर क्राइम न्यूज 
हडपसर मराठी बातम्या 
Hadapsar Latest News Hadapsar News

नागपुर : देशातील अशा गावांमध्ये ज्या गावात कुठल्याही कंपनीच्या मोबाईलचे कव्हरेज किंवा सेवा उपलब्ध नाही अशा 28 हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट 4 जी मोबाईल सेवा देण्याची सुरुवात ‘4 जी सॅच्युरेशन प्रकल्पा ‘ अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती भारत संचार निगम लिमिटेड –बीएसएनएल, नवी दिल्लीच्या कार्पोरेट कार्यालयाच्या मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी  नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

जगामध्ये मोबाईल उत्पादक तसेच 3जी, 4 जी आणि 5 जी सेवा देणाऱ्या काही मोजक्याच कंपन्या आहेत. याच क्रमामध्ये भारतात सुद्धा 3जी, 4 जी आणि 5 जी टेलिकॉम सेवा देणारी मोबाईल कंपनी असली पाहिजे या उद्देशाने भारत सरकार प्रयत्न करत आहे.

बीएसएनएल द्वारे पदार्पण केलेली 4-जी सेवा ही विश्वस्तरावरील राहणार असून या सेवेला 5जी सेवेमध्ये रुपांतरित होण्याला वेळ लागणार नाही. सध्याचे 4 जी उपकरण 5जी मध्ये अपडेट होतील, अशी माहिती वडनेरकर यांनी दिली.

राज्यामध्ये 4,900 खेड्यांमध्ये बीएसएनएलच्या 4 जी सेवेची सुरुवात करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर यासारख्या दुर्गम भागामध्ये मोबाईल टॉवर्स 4जी मध्ये अपडेट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

बीएसएनएलचे नागपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक यश पान्हेकर यांनी सांगितलं की, भारतात बनणाऱ्या मोबाईलमुळे ग्राहकांच्या कॉलची, डेटाची सिक्युरिटी सुनिश्चित होईल त्याचप्रमाणे यामुळे रोजगार उपलब्धता होऊन तंत्रज्ञानाची निर्यात वाढेल. महाराष्ट्र सर्कलचे बीएसएनएलच्या एकूण महसूल आणि संकलनामध्ये जवळपास 20% योगदान असल्याची माहिती महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांनी दिली.

या पत्रकार परिषदेच्या पूर्वी बीएसएनएलच्या 19 व्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संचालक अरविंद वडनेरकर यांच्या हस्ते झालं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *