अमरनाथ यात्रेमध्ये यात्रेकरूंसाठी असलेल्या आरोग्य सेवांचा घेतला आढावा

Amarnath Yatra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.

Health services available for pilgrims in Amarnath Yatra were reviewed

अमरनाथ यात्रेमध्ये यात्रेकरूंसाठी असलेल्या आरोग्य सेवांचा घेतला आढावा

अमरनाथ यात्रेमध्ये यात्रेकरूंसाठी असलेल्या आरोग्य सेवांचा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी घेतला आढावा

यात्रेदरम्यान सर्व यात्रेकरूंना उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील हे सुनिश्चित करण्यात येईल : डॉ मनसुख मांडविया

नवी दिल्‍ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्लीत आरोग्य मंत्रालय आणि आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंसाठी देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा आणि सुविधांचा आढावा घेतला.

Dr Mansukh Mandaviya
File Photo

मांडविया यांना मुख्य तळावर (बेस कॅम्प) आणि यात्रेच्या मार्गात दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा आणि इतर आरोग्य सुविधांची माहिती देण्यात आली. अमरनाथ यात्रेचा कठीण प्रवास करण्यासाठी यात्रेकरूंची ,आरोग्य आणि शारीरिक स्थिती उत्तम राहावी यासाठी त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सेवा पुरविल्या जातील हे सुनिश्चित करण्यासाठी , जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाला सहाय्य करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. “यात्रेदरम्यान यात्रेकरूंना उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील हे सुनिश्चित करण्यात येईल”, असे मंत्र्यांनी सांगितले.

भू-वातावरणीय आव्हाने, विशेषत: खूप उंचीवर येणाऱ्या समस्यांच्या बाबतीत अमरनाथ यात्रा असामान्य आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशानुसार, या यात्रेसाठीच्या आरोग्य सेवा व्यवस्थेसाठी पुरेशा आरोग्य आवश्यकता वाढवण्याच्या आणि अपेक्षित सेवा देण्याच्या प्रयत्नात, आरोग्य मंत्रालय जम्मू आणि कश्मीरच्या केंद्रशासित प्रदेश सरकारला सहाय्य करत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे, यात्रेच्या बालताल आणि चंदनवारी या दोन प्रवेश मार्गांवर 100 खाटांची दोन रुग्णालये स्थापन करण्यासाठी पूर्णपणे निधी आणि पाठबळ दिले असून ही रुग्णालये कार्यान्वित झाली आहेत. या रुग्णालयांमध्ये यात्रेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवास सुविधांचा समावेश असेल.या रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा सुविधा, रेडिओ निदान, स्त्रीरोग, आयसीयू, हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबर्ससह निदान आणि उपचारांसाठी सर्व सुविधा असतील.

ही रुग्णालये 24×7 कार्यरत राहतील आणि स्वतंत्र ट्रॉमा युनिटसह तज्ज्ञ डॉक्टर देखील कार्यरत असतील. आरोग्य सेवा महासंचालनालयाने (केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय) 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्र सरकारी रुग्णालयांमधून नियुक्त्या मागवून आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना प्रतिनियुक्तीही दिली आहे.

वेब पोर्टल/आयटी एप्लिकेशन

आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सज्जतेसाठी , आजारांचे स्वरूप समजून घेण्यासाठी आणि आरोग्याशी संबंधित समस्यांचे निरीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या (एनसीडीसी) एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रम (आयडीएसपी) – एकात्मिक आरोग्य माहिती मंच (आयएचआयपी) पोर्टलद्वारे अमरनाथ यात्रेसाठी सानुकूलित वेब-सक्षम प्रत्यक्ष वेळेचा डेटा संकलन मॉड्यूल विकसित केले जात आहे.

जागरूकता सल्ला

आरोग्य मंत्रालयाने यात्रेकरूंची जागरूकता वाढवण्यासाठी, ‘काय करा आणि काय करू नका ‘अशा सूचना तयार केल्या आहेत. खूप उंचीवरील आणीबाणीच्या वैद्यकीय तसेच पुरेशा वैद्यकीय व्यवस्थापनासाठी विशेष कार्यप्रणाली देखील तयार करण्यात आली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *