मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचं लक्ष्य दीडशे जागांचं असेल

Home Minister Amit Shah गृहमंत्री अमित शहा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

BJP’s target will be 150 seats in Mumbai Municipal Corporation elections – Amit Shah

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचं लक्ष्य दीडशे जागांचं असेल – अमित शहा

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती

Home Minister Amit Shah गृहमंत्री अमित शहा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचं दीडशे जागांचं लक्ष्य असून, मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्वास वरिष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

ते आज आपल्या मुंबई दौऱ्यात  भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मुंबईत राजकारणावर केवळ भाजपाचं वर्चस्व असायला हवं, त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं मैदानात उतरून काम करायला हवं, असं ते यावेळी म्हणाले.

शिवसेनेनं आपला विश्वासघात केला असून, विश्वासघात करणाऱ्यांना कुठलीही माफी नसल्याचं ते म्हणाले. त्यापूर्वी सकाळी अमित शहा यांनी लालबागचा राजा आणि वांद्रे इथल्या सार्वजनिक गणेश मंडळात गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. श्री. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, खासदार मनोज कोटक, एल अँड टी चे अध्यक्ष ए.एम नाईक, सीईओ एस.एम. सुब्रमण्यम, चेरिटेबल ट्रस्टचे जिग्नेश नाईक, प्राचार्य मधुरा फडके, शिक्षक आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, उच्च व तंत्र आणि संसदीय कार्य मंत्री चंदकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय कुटे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी मंत्री विनोद तावडे, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, राजशिष्टाचार विभागातील अधिकारी, उपनगरच्या जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *