काटेपूर्णा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

Katepurna Sanctuary काटेपूर्णा अभयारण्य हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Crowd of tourists in Katepurna Sanctuary

काटेपूर्णा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

अकोला: काटेपूर्णा हे अभयारण्य अकोलाच्या जवळ असून मुख्यतः काटेपूर्णा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात आहे. हे जलाशय मुख्यत्वे पाणथळ पक्ष्यांना आकर्षित करते.Katepurna Sanctuary काटेपूर्णा अभयारण्य हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

अभयारण्य चौशिंगी काळवीट आणि बार्किंग हरणासाठी प्रसिद्ध असून इतर प्राण्यांमध्ये काळे हरीण, लांडगा, बिबट्या, तरस, रानडुक्कर, नीलगाय, ससा, जंगली मांजर, माकड ह्यांचा समावेश होतो, सामान्य गवताळ प्रदेश आणि पाणथळ पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे बघायला मिळतात. मोर आणि लांडोर येथे पर्यटकांकडून सामान्यतः बघितले जातात. काटेपूर्णा पाणी जलाशय स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना आकर्षित करते.

काटेपूर्णा अभयारण्यात बिबट, अस्वल, तडस, लांडगा, निलगाय, काळवीट, भेकर, चितळ, रानससा, रानडुक्कर, साळींदरासह विविध प्रकारचे २५ सस्तन प्राणी आढळतात.

पाणी देणारं जंगल म्हणून प्रख्यात असलेल्या आणि वाशीम तसंच अकोला जिल्ह्याच्या सीमेवर ७३.६९ वर्ग किमी क्षेत्रात वसलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातली निसर्ग पर्यटनाची सोय पूर्ववत उपलब्ध करून देण्यात आलं असल्यामुळं, या अभयारण्यातल्या जंगल सफारीचा, तसंच निसर्ग पाऊलवाट आणि नौका विहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

त्याव्यतिरिक्त या अभयारण्यात नवरंग, स्वर्गिय नर्तक, सुभग व हळद्या सारखे १२३ प्रकारचे पक्षीही आढळतात. सर्पगरूड, शिक्रा व कापशी असे शिकारी पक्षीही तिथं हमखास पाहायला मिळतात.

या अभयारण्यात पानगळीच्या वनात पळस, काटेसावर, तेंदु, खैर, वड, पिंपळ, सलई यांसारख्या वृक्षांच्या ५१. झुडूपांच्या २३. वेलीच्यां ८ व गवतांच्या १८ प्रजाती आढळतात. येथील झुडुपे हि दक्षिणी उष्ण व कोरडे पानझडी वन असून येथे वनस्पतींच्या ११५ प्रजाती आढळतात. मुख्य वृक्ष प्रजातींमध्ये बेहडा, धावडा, मोह, सळई, ओला, तेउदे इत्यादी येथे बहुसंख्य प्रमाणात आढळतात.

तिथल्या जंगल सफारी दरम्यान रिव्हर व्हयु पॉईंट, पांडव लेणी, घारीचा आसोडा, कळंबाचा गवताळ प्रदेश,द वाघडोह, डॉ.सलीम अली चौफुला आणि बेरूचा घाट या भागातुन फीरताना विविध वन्यप्राणी आणि पक्ष्यांचं दर्शन होतं.

काटेपूर्णा धरणामुळे तयार झालेला जलाशय हा अभयारण्याचा महत्वाचा भौगोलिक घटक असून या जलाशयामुळं हे अभयारण्य वेगवेगळ्या पक्ष्यांसाठी नंदनवनच ठरलं आहे. कोरोनाच्या सावटामुळं गेली दोन वर्ष पर्यटनावर निर्बंध असल्यानं पर्यटकांची वर्दळ कमी झाली होती.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *