अमेरिकन बँकिंग प्रणालीच्या सुरक्षेसाठी आवश्यक कारवाई करण्याचं आश्र्वासन

US President Joe Biden

President Joe Biden’s assurance of taking necessary action to protect the American banking system,

अमेरिकन बँकिंग प्रणालीच्या सुरक्षेसाठी आवश्यक कारवाई करण्याचं अध्यक्ष ज्यो बायडन यांचं आश्र्वासन

सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक दिवाळखोरीत निघाल्याच्या पार्श्र्वभूमीवर अमेरिकन बँकिंग प्रणालीच्या सुरक्षेसाठी आवश्यक कारवाई करण्याचं अध्यक्ष ज्यो बायडन यांचं आश्र्वासन

US President Joe Biden
File Photo

वॉशिंग्टन : सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन बँकिंग प्रणालीची सुरक्षा निश्चित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे वचन दिले आहे.

बायडन यांनी बाजार आणि ठेवीदार यांना आश्वस्त कऱण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दोन्ही बँकांमधील ठेवींची हमी देण्यासाठी आणीबाणीच्या उपाययोजना केल्यानंतरही, जगभरातल्या इतर बँकांबाबत असलेली गुंतवणुकदारांची चिंता दूर कऱण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.

अमेरिकेतल्या प्रमुख बँकांचे शेअर बाजारात 70 अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये या बँकांना 170 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला आहे.

युरोपमध्येही याचे धक्के जाणवले, जेथे STOXX बँकिंग निर्देशांक 5.7 टक्क्यांनी कमी झाला. जर्मनीची कॉमर्जबँक १२.७ टक्क्यांनी घसरली, तर क्रेडिट सुईस ९.६ टक्क्यांनी घसरून नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर गेली.

स्विस वित्तीय नियामक FINMA ने सांगितले की ते बँका आणि विमा कंपन्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, तर वरिष्ठ युरोपियन सेंट्रल बँकेच्या पर्यवेक्षकाने सांगितले की युरो झोनमधील सर्वात मोठ्या बँकांवर देखरेख करणार्‍या मंडळाला आपत्कालीन बैठकीची आवश्यकता वाटत नाही.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *