२९ जुलैला आरक्षण सोडत काढायचे निवडणुक आयोगाचे निर्देश

State Election Commissioner. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

Election Commission’s instructions to draw reservation for municipal elections on 29th July

महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी २९ जुलैला आरक्षण सोडत काढायचे निवडणुक आयोगाचे निर्देश

मुंबई : राज्यातल्या १३ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगानं येत्या २९ जुलैला आरक्षण सोडत काढायचे निर्देश दिले आहेत. इतर मागासवर्ग, इतर मागासवर्गीय महिला आणि खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी ही सोडत काढली जाणार आहे.State Election Commission. राज्य निवडणूक आयोग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

याआधी ३१ मे ला तेरा महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती यात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महापालिकांचा समावेश होता. मात्र २० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार याची दुरुस्ती आता करणं आवश्यक आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने २५ जिल्हा परिषदा आणि २८५ पंचायत समिती यांच्या सर्वत्रिक निवडणुका संदर्भातही दुरुस्ती निर्देश जारी केले आहेत. यानुसार येत्या २८ जुलै रोजी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग आणि महिला प्रवर्ग साठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. याशिवाय राज्यातल्या १५५ नगरपरिषदा आणि ९ नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठीही दुरुस्ती आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *