महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी

Women's T20 Asia Cup Final: India win against Sri Lanka by 8 wickets महिला T20 आशिया कप फायनल: भारताचा श्रीलंकेवर 8 गडी राखून विजय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

India defeated Pakistan by 7 wickets in the Women’s T20 World Cup

महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी

केपटाऊनमध्ये झालेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला

Women's T20 Asia Cup Final: India win against Sri Lanka by 8 wickets महिला T20 आशिया कप फायनल: भारताचा श्रीलंकेवर 8 गडी राखून विजय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

केपटाऊन: आयसीसी महिलांच्या २० षटकांच्या विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत आपल्या पहिल्याच आणि चुरशीच्या सामन्यात केपटाऊन इथं भारतानं पाकिस्तानवर ७ गडी आणि सहा चेंडू राखून विजय मिळवला.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने ४ बाद १४९ धावा केल्या. कर्णधार बिस्माह मारूफने नाबाद ६८ धावा केल्या, तर आयेशा नसीमने ४३ धावा केल्या. भारताकडून राधा यादवने 2, दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी 1 बळी घेतला.

भारतीय संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात एकोणिसाव्या षटकातच हे उद्दिष्ट साध्य केलं. १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १९ षटकांत ३ गडी गमावून १५१ धावा केल्या.

भारताची जेमिमा रॉड्रीग्ज ५३ धावांसह नाबाद राहिली, तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेफाली वर्माने ३३ धावा आणि रिचा घोषने नाबाद ३१ धावा केल्या. पाकिस्तानकडून नशरा संधूने दोन तर सादिया इक्बालने एक विकेट घेतली.

भारतीय महिलांचा पुढील सामना परवा बुधवारी वेस्ट इंडीज संघासोबत होणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *