आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

Indian squad announced for the upcoming World Cup cricket tournament आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Indian squad announced for the upcoming World Cup cricket tournament

आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी १५ जणांच्या भारतीय संघाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली घोषणा

स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान

पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी विश्वचषक स्पर्धांसाठी १५ जणांच्या भारतीय संघाची आज मुंबईत घोषणा केली. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालच्या निवड समितीनं भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची, तर उपकर्णधार म्हणू अष्टपैलू हार्दिक पांड्याची निवड केली आहे.Indian squad announced for the upcoming World Cup cricket tournament
आगामी विश्वचषक क्रिकेट  स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व देशांना ५ सप्टेंबरपर्यंत त्यांचा संघ घोषित करायचा आहे. २७ सप्टेंबरपर्यंत संघात बदल केले जाऊ शकतात.

ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. टीम इंडिया आपला पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

दुखापतीमुळे दीर्घ काळ विश्रांती घेऊन परतलेल्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या मुख्य संघात विराट कोहली, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचा समावेश असून, मायदेशाच्या भूमीत दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचं त्यांचं लक्ष्य आहे.

संजू सॅमसन, टिळक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघातून वगळण्यात आलं आहे. भारतानं यापूर्वी 2011 मध्ये एम. एस. धोनी याच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये विजय मिळवला होता

एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
शिक्षक जीवनाला आकार देतात – प्राचार्य दत्तात्रय जाधव
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *