नमो महारोजगार मेळावापूर्व प्रशिक्षणाचे शुक्रवारी आयोजन

Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Pre-Namo Maharojgar Mela training organized on Friday

नमो महारोजगार मेळावापूर्व प्रशिक्षणाचे शुक्रवारी आयोजन

नोकरी विषयक कौशल्ये (सॉफ्ट स्कील्स), मुलाखत तंत्र या विषयांवर मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम

पुणे : पुणे विभागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बारामती येथे २ व ३ मार्च रोजी आयोजित विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या पार्श्वभूमीवर शुक्रवार १ मार्च रोजी नोकरी विषयक कौशल्ये (सॉफ्ट स्कील्स), मुलाखत तंत्र या विषयांवर मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

हा प्रशिक्षण कार्यक्रम १ मार्च रोजी बारामती शहरातील शारदानगर येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे आप्पासाहेब पवार सभागृहात सकाळी १० ते १२, शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे सभागृह व विद्याप्रतिष्ठानचे गदिमा सभागृह, विद्यानगरी येथे सकाळी १० ते २ व श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सभागृहात दुपारी २ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

रोजगार मिळविण्यासाठी मुलाखतीला जाताना युवक-युवतींना प्रशिक्षणाचा लाभ होणार असून रोजगार इच्छुक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

अमेरिका-महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार

Spread the love

One Comment on “नमो महारोजगार मेळावापूर्व प्रशिक्षणाचे शुक्रवारी आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *